पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी बोलले होते की मंगळसूत्र चोरलं जाणार. मंगळसूत्र यांना देणार. आता हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? असा खोचक प्रश्न विचारत शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टिकेची झोड उठवली आहे. भाजपने अल्पसंख्यांकांपर्यंत पोहोचण्यासाठी रामजान ईद निमित्त सौगात ए मोदी किट वाटपाचा निर्णय घेतला आहे. त्यावरून आज उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टीका केली आहे. यावेळी भाजपने हिंदुत्व सोडल्याची घोषणा करावी असंही उद्धव ठाकरेंनी म्हंटलं.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुस्लिमांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यावर यांचे डोळे पांढरे झाले होते. मुस्लिमांनी मते दिले तर सत्ता जिहाद म्हणायचे. आता ईद निमित्त सौगात हे मोदी हा कार्यक्रम भाजपने घेतला आहे. आता त्यांचं ढोंग उघडं पडलं आहे. ३२ लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन ३२ लाख भाजपचे कार्यकर्ते भेट देणार आहे. हा सौगात ए मोदी नाही. हा निर्लज्जपणा आहे. सौगात ए सत्ता आहे. हे बोगस हिंदुत्ववादी आहे. मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आली तर पुरणपोळी द्यायची. आता जे उडाणटप्पू आहेत ते कसे टोपी घालून कसे जातात ते पाहा. सौगात ए सत्ता ही बिहार यूपी निवडणुकीपर्यंतच राहणार की अजूनही राहणार आहे. भाजपने एकदा हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं, असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हंटलं.