सोसायटी मधून दोन लाखांची कॉपर वायर चोरीला

0
194

दिघी, दि. 13 (प्रतिनिधी)

पठारे मळा चऱ्होली येथून एका सोसायटी मधून दोन लाख रुपये किमतीची कॉपर वायर चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी चार ते पाच वाजताच्या सुमारास घडली.

सुशांत सुरेश सासुलकर (वय 34, रा. बाणेर) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा (एमएच 12/केआर 1953) मधून आलेल्या चार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठारे मळा चऱ्होली येथील किंग्जबरी सोसायटी प्राइड वर्ल्ड सिटी या सोसायटीमध्ये एका रिक्षातून चार अनोळखी इसम आले. त्यांनी बिल्डिंगच्या डक मधील दोन लाख रुपये किमतीची 480 मीटर लांबीची कॉपर आर्थिक वायर चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.