सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाकडून सात वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

0
411

रावेत, दि. २८ (पीसीबी) – सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीवर सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. 26) सायंकाळी साडेसहा वाजता पुनावळे येथे घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मंटूकुमार श्री शिवकुमार गौंड (वय 30, रा. पुनावळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सात वर्षाची मुलगी तिच्या मैत्रिणी सोबत सोसायटीच्या पार्किंग मध्ये खेळत होती. त्यावेळी सोसायटीचा सुरक्षा रक्षक गौंड याने फिर्यादी यांच्या मुलीला सोसायटी ऑफिसच्या शेजारी असलेलेया शौचालयात नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोसायटी मधील नागरिकांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.