सोसायटीच्‍या पार्किंगमधून बुलेट चोरीला

0
67

चाकण, दि. २० (पीसीबी) : सोसायटीच्‍या पार्किंगमधून बुलेट चोरीला गेली. ही घटना १३ सप्‍टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास आंबेठाण रोड, चाकण येथे घडली.

आदम नासीर अन्‍सारी (वय ३४, रा. राजलक्ष्‍मी वृंदावन, आंबेठाण रोड, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, १३ सप्‍टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास फिर्यादी यांनी त्‍यांची २५ हजार रुपये किमतीची बुलेट सोसायटीच्‍या पार्किगमध्‍ये पार्क केली होती. त्‍यावेळी अज्ञात चोरट्याने बुलेटचे लॉक तोडून चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.