सोसायटीच्या पदाधिकारी महिलेला शिवीगाळ

0
492

मोशी, दि. २२ (पीसीबी) – भाडेकरू पाण्याचा नळ सुरु ठेऊन पाणी वाया घालवत असल्याने सोसायटीच्या पदाधिकारी महिलेने जाब विचारला असता त्याच्या घर मालकाने सोसायटीच्या पदाधिकारी महिलेला आणि इतर नागरिकांना शिवीगाळ केली. तसेच पदाधिकारी महिलेचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री शिवाजीवाडी मोशी येथे घडली.

राजकुमार सस्ते (वय 60), मयूर सस्ते (वय 30), महिला (वय 55) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोसायटीच्या सहखजिनदार म्हणून काम पाहतात. त्यांच्या सोसायटीमध्ये आरोपींचा फ्लॅट आहे. तो फ्लॅट त्यांनी पोंडुरंग पवळे याला दिला आहे. पवळे हा फ्लॅटमधील नळ सुरु ठेऊन पाणी वाया घालवत असे. त्याबद्दल फिर्यादी यांनी फ्लॅटचे मालक आरोपींना जाब विचारला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना, त्यांच्या पतीला आणि इतर लोकांना शिवीगाळ केली. त्यांना मारण्याची धमकी दिली. फिर्यादींसोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.