हिंजवडी, दि. १२ (पीसीबी)- सोसायटीचा जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडित केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री ब्ल्यू रिच सोसायटी, फेज एक, हिंजवडी येथे घडली.
महादेव जयचंद पुरी (वय 30, रा. हिंजवडी), अभिजित कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संदीप संतोष बोरकर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बोरकर यांच्या सोसायटीमध्ये आरोपी महादेव आणि अभिजित हे इलेक्ट्रिक कामे करीत होते. 31 डिसेंबर रोजी आरोपींनी बेकायदेशीरपणे सोसायटीमध्ये प्रवेश करून जाणीवपूर्वक सोसायटीचा विजपुरवठा खंडित केला. लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.












































