सोशल मीडियावरील मित्राने केला लैंगिक अत्याचार

0
301

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- सोशल मीडिया वरून ओळख झालेल्या मित्रांनी वारंवार पाठलाग करून महिलेचे फोटो काढून धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार चार नोव्हेंबर ते दहा मार्च या कालावधीत पिंपरी, शिर्डी आणि नांदेड परिसरात घडला.

बसवंत माधवराव गायकवाड (रा. नांदेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गायकवाड यांनी फिर्यादी महिलेला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यातून फिर्यादी सोबत ओळख वाढवली. त्यानंतर फिर्यादीने गायकवाड याला ब्लॉक केले. तरीही गायकवाड याने वेगवेगळ्या नंबर वरून फिर्यादी यांना मेसेज पाठवून त्यांचा पाठलाग केला. फिर्यादीस भेटण्यासाठी आग्रह करून त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत महिलेला शिर्डी येथे भेटायला बोलावले. तिथे महिलेचे फोटो काढून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. नांदेड येथे देखील महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.