सोलापूर, औरंगाबाद, नवी दिल्ली, लखनऊमध्ये तणाव ,देशातील मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरल्याने खळबळ

0
361

सोलापूर, दि. १० (पीसीबी) – शुक्रवारचे नमाज पठण झाल्यानंतर सोलापूर आणि औरंगाबाद शहरात मुस्लिम बांधवांनी विराट मोर्चा काढला. अत्यंत संतप्त प्रतिक्रीया उमेटली आहे. दरम्यान, देशभर अशा पध्दतीने मुस्मिम बांधवांनी शक्तीप्रदर्शन केल्याने तणावाचे वातावरण आहे. नुपूर शर्मा यांना अटक करा, अशी मागणी मोर्चाने करण्यात आली आहे. 

मुस्लिम समाजाकडून सोलापूर आणि औरंगाबाद येथे जबरदस्त शक्ती प्रदर्शन कऱण्यात आले. गर्दीचा महापूर दोन्ही शहरात असल्याने पोलिसांची धावपळ झाली, दमछाक झाली. खूप जोरदार निदर्शने सुरू आहेत. तिरंगा तसेच चांदतारा घेतलेले ध्वज घेऊन नारे तकदीर अल्ला हो अकबर च्या नारेबाजीने परिसर गजबजून गेला आहे. औरंगाबाद ते जळगावचा रस्ता ब्लॉक झाल्याने मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
देशात नवी दिल्ली, लखनऊ सह अन्य शहरांतूनही अशाच पद्धतीने निदर्शने सुरू झाल्याने वातावरण तणावपूर्ण आहे.