सोलापूरचं राजकारण बदलणार; या मोठ्या नेत्याने केला अजिदादांच्या गटात प्रवेश

0
155

सोलापूर, दि. १४ (पीसीबी) : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्यातील राजकीय समिकरणं बदलू लागली आहेत. सोलापूरमध्ये घडामोडींना वेग आला आहे. सोलापुरातील माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते पाटलांना मोठा धक्का दिला आहे. मोहिते पाटलांच्या समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी समर्थकासह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. प्रकाश नवगिरे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतानाच विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देखील दर्शवला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. माढा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते पाटील गटाला जोरदार राजकीय धक्का दिला आहे. महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी त्यांच्या समर्थकासह माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांना समर्थन दिलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बबनराव शिंदे यांना मिळणारं समर्थन वाढलं आहे.

प्रकाश नवगिरे यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार बबनराव शिंदे यांना मोठा फायदा होऊ शकतो. त्यांचा कार्यकर्त्यांशी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असणारा नेता बबनराव शिंदे यांच्या गळाला लागला आहे. मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात नगरपंचायतमध्ये आमदार बबनराव शिंदे गटाची नगरसेवक संख्या नगराध्यक्षांसह 8 इतकी झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. महाळुंग श्रीपुर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात वेगवान घडामोडी घडत आहेत. अशातच आमदार बबनराव शिंदे यांनी पुण्यातील मोदी बागेत जात महिनाभरापूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यामुळे ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. बबनराव शिंदे हे त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. अशातच बबनराव शिंदे आपल्या समर्थकांची संख्या वाढवताना दिसत आहेत. महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी त्यांच्या समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी बबनराव शिंदे यांना पाठिंबा दिलाय.