दि.२५(पीसीबी)- सोलापूर परिसरात मुसळधार पावसामुळे विडी घरकुल विभागातील अनेक कुटुंबांचे हाल झाले. पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मदतीसाठी धावून गेले.पावसाचे पाणी घरात घुसले आहे, हे समजताच स्थानिक स्वयंसेवकांनी संपूर्ण परिसराचा आढावा घेतला. सर्व घरांमध्ये गुडघाभर पाणी आले होते त्या मुळे रात्रभर सर्वांनी पलंगावर बसून रात्र काढली. घरा बाहेर पाणीच पाणी साचलं होत आपत्कालीन स्थिती समजून घेतली. नंतर तातडीने १०० लोकांच्या न्याहारी ची व्यवस्था करून गरजू लोकांना न्याहारी आणि बिस्कीटे देण्यात आली.
त्यानंतर केशव नगर व पंचमूर्ती नगर मधील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दुपारच्या शिदोरीचे नियोजन केले. काही नागरिक आणि स्वयंसेवक यांच्या कडून चपाती, भाजी आणि शेंगा चटणी संकलन करून ते पेपर मध्ये बांधून प्रत्येक घरी देण्यात आले, त्या सोबत १ पाण्याची बाटली सुद्धा देण्यात आली.
या सर्व कार्यकर्त्यांनी सुमारे २०० कुटुंबांसाठी एक वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. संकलनात २,००० पोळ्या,भाजी व शेंगा चटणी असे पदार्थ एकत्र दिले. हे संकलन आजुबाजूच्या भागातून व आपल्या कार्यकर्त्यांकडून जमा करून गरजूंपर्यंत तत्परतेने पोहोचविण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “आपत्तीच्या काळात संघ कार्यकर्ते नेहमीच समाजासाठी पुढे सरसावतात” अशी भावना व्यक्त केली.
या आपात्कालीन परिस्तिथीत अनेक नागरिकांच्या घरात घाण पाणी गेल्यानं रोगराई पसरू शकते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सोलापूर यांच्या मार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.