सोमी अलीने ऐश्वर्या राय आणि सलमानबद्दलचा केला सर्वात मोठा खुलासा

0
109

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या नात्याबद्दल अजूनही चर्चा होत असते. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सलमान आणि ऐश्वर्या काही कारणांमुळे वेगळे झाले. त्यांची जोडी तेव्हा प्रचंड फेमस होती. लवकरच ते दोघे लग्न करतील, अशा चर्चा तेव्हा व्हायच्या. मात्र, त्यांच्या दोघांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. दरम्यान ऐश्वर्यामुळे सलमान खानचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे.

सलमान खानच्या आयुष्यात ऐश्वर्या येण्याआधी त्याचं एका अभिनेेत्रीवर प्रेम होतं. सलमान जिच्या प्रेमात पडला होता ती अभिनेत्री होती सोमी अली. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना सोमी आलीने तिच्या प्रेमप्रकरणाबदल खुलासा केला आहे. बोलत असताना सोमी आली म्हणाली की, संजय लीला भन्साळीच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा ऐश्वर्या आणि सलमानची जवळीक वाढली होती. एके दिवशी तिने शूटिंग करत असताना सलमानला फोन केला होता. पण त्याने फोन उचलला नाही.

सोमी आली म्हणाली की, सलमानने फोन उचलला नाही त्यानंतर मी भन्साळींना फोन केला, त्यांनी फोन उचलला आणि सलमानचं शूटिंग सुरू असल्याचं सांगितलं. सोमीला हे समजलं नाही आणि ती म्हणाली, “जर तो शॉटमध्ये आहे तर ते दिग्दर्शन का करत नाहीयेत, त्यांनी माझा फोन कसा उचलला? भन्साळींनी तिला जे सांगितलं ते तिच्या समजण्याच्या पलीकडचं होतं. ते बोलताना अडखळत होते. त्यांना काय बोलावं ते कळत नव्हतं आणि नंतर ऐश्वर्या राय सलमानच्या जिममध्ये येऊ लागली, असं सोमी म्हणाली.