सोमाटणे गावात अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, चार किलो गांजा जप्त

0
294

सोमाटणे, दि. ३ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील सोमाटणे गावात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. मंगळवारी (दि. २८) केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी चार किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे.

प्रवीण रमेश शेडगे (वय ३०, रा. सोमाटणे गावठाण, ता. मावळ) याला गांजा विक्री प्रकरणी अटक केली आहे. त्याने हा गांजा मराठे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) नावाच्या व्यक्तीकडून आणला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण शेडगे हा गांजा विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पवना नदीच्या कडेला छापा मारून कारवाई करत प्रवीण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ७५० रुपये किमतीचा चार किलो ३० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.