पिंपरी, दि. ८ ( पीसीबी )– आर्ट ऑफ लिव्हिंग, पिंपरी चिंचवड आणि वैदिक धर्म संस्थान तर्फे पिंपरी चिंचवड मध्ये ५ जुलै रोजी शनिवारी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग चे सहर्ष स्वागत झाले
मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग ची रुद्र पूजा व दर्शन सोहळा मध्ये सुमारे ३५०० पेक्षा जास्त भाविकांनी कासा डी सिल्व्हर, ताथवडे, चिंचवड येथे लाभ घेतला.
आर्ट ऑफ लिव्हिंग चे बेंगळूर येथील आंतरराष्ट्रीय आश्रम मधून आलेले दर्शक हाथी आणि वेद पंडित ह्यांनी ही रुद्रपुजा केली व ह्या ज्योतिर्लिंगाचे महत्व ही पटवून दिले .
आर्ट ऑफ लिव्हिंग चे वैदिक धर्म संस्थान चे राज्य समन्वयक, पिंपरी चिंचवड चे समन्वयक, प्रशिक्षक, सत्संग कलाकार व स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम करून पुणे, पिंपरी चिंचवड पूर्ण शहर भरातून आलेल्या सर्व भाविकांना जवळून उत्तम दर्शन घडवले.
सर्व भाविक रुद्रम मंत्र व सत्संग मध्ये मंत्रमुग्ध होऊन भारावून गेले होते.
१००० वर्षांपूर्वी सोमनाथ मंदिराच्या विध्वंसानंतर, ज्योतिर्लिंगाचे काही भाग पुन्हा प्रगट झाले आणि ते गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांना देण्यात आले.
श्रावण महिन्यात पुणे, पिंपरी चिंचवड पूर्ण शहरामध्ये दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही सर्वत्र नेहमी प्रमाणे स्पटिक शिवलिंगावर रुद्र पूजा आयोजित होत आहे तर सर्व भाविकांना त्यासाठी ही आयोजकांनी , समन्वयकांनी आमंत्रित केल.