सोफ्यावर चपला घालून खेळू नका म्हटल्याने बँक मॅनेजरला मारहाण

0
103

वाकड, दि. 22 (पीसीबी) –

लहान मुले बँकेतील सोफ्यावर चपला घालून खेळत असल्याने बँक मॅनेजरने मुलांना सोफ्यावर खेळू नका, असे म्हटले. त्या कारणावरून सहा जणांनी मिळून बँक मॅनेजर तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 21) दुपारी पंजाब नॅशनल बँक वाकड येथे घडली.

मोहम्मद रजा काद्री (वय 33, रा. बालेवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कौसूर नूर मोहम्मद शेख, रिजवान नूर सय्यद, आवेश मतीन खान, साहिल जोगदंड आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कौसूर हा एक महिला व लहान मुलासोबत बँकेत आला हो.ता लहान मुले चप्पल बूट घालून बँकेतील सोफ्यावर खेळत होते. त्यामुळे बँक मॅनेजर मोहम्मद काद्री यांनी मुलांना सोफ्यावर खेळू नका असे सांगितले. त्याचा राग आल्याने कौसूर आणि त्याच्या सोबत आलेल्या महिलेने बँक मॅनेजर मोहम्मद यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर महिलेने तिच्या नातेवाईकांना बँकेत बोलावून घेऊन मोहम्मद यांच्या कामात अडथळा निर्माण केला. तसेच बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.