सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तीन महिलांनी पळवले सोन्याचे दागिने

0
568

चाकण, दि. २७ (पीसीबी) – सराफी पेढीमध्ये सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तीन महिलांनी दुकानातील कामगार महिलेने दाखवलेले सोन्याचे दागिने हातचलाखीने चोरून नेले. ही घटना 15 ऑक्टोबर रोजी माणिक चौक, चाकण येथील अंबिका ज्वेलर्स येथे घडली.

याप्रकरणी दुकानातील कामगार महिलेने 25 ऑक्टोबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महतीनुसार, फिर्यादी या चाकण येथील अंबिका ज्वेलर्स या दुकानात कामा करतात. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तीन महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या. फिर्यादी यांनी त्या तीन महिलांना दागिने दाखवले. दरम्यान, महिलांनी दागिने पाहत असताना हात चलाखीने दागिने पाहण्याचा बहाणा करून 33 हजार 120 रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स विश्वासघात करून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत