सोनिया गांधींची चौकशी विरोधी पक्ष संपवण्यासाठी : दिप्ती चवधरी

0
406

शहर काँग्रेसचे नाशिक फाटा चौकातील सत्याग्रह आंदोलन स्थगित

पुणे, दि. २९ (पीसीबी) – महाराष्ट्र हेरॉल्ड प्रकरणाची चौकशी पंधरा वर्षांपूर्वीच संपली होती. तरीदेखील निव्वळ सूडबुद्धीने आणि देशातील प्रबळ विरोधी पक्ष संपवण्याच्या उद्देशानेच भारतीय जनता पार्टी पुन्हा पुन्हा या विषयावर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावून त्रास देत आहे. खरे तर लोकशाहीमध्ये निकोप स्पर्धा असावी, परंतु भाजप लोकशाहीचा गळा घोटून हुकुमशाही कडे वाटचाल करीत आहे अशी टीका माजी आमदार दिप्ती चवधरी यांनी केली.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडी मार्फत चौकशी करून केंद्र सरकार नाहक त्रास देत आहे. केंद्र सरकारच्या जुल्माविरोधात मंगळवार पासून पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिक फाटा चौक, कासारवाडी येथे सत्याग्रह सुरू होते. गुरुवारी (दि. २८) रात्री माजी आमदार दिप्ती चवधरी यांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी माजी महापौर कवीचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक बाबू नायर, मारुती भापकर, माजी नगरसेविका निर्मला कदम, महिला शहराध्यक्ष सायली नढे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, दिलीप पांढरकर, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, अॅड. उमेश खंदारे, सहकार सेल अध्यक्ष के. हरिनारायण, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहीतुले, छायाताई देसले, स्वाती शिंदे, नंदा तुळसे, राहुल ओव्हाळ, प्रा. बी. बी. शिंदे, विजय ओव्हाळ, प्रवीण कदम, हिरा जाधव, आबा खराडे, हरीश डोळस, चक्रधर शेळके, वीरेंद्र गायकवाड, प्रियंका मलशेट्टी, किरण खाजेकर, सुप्रिया पोहरे, मेहबूब शेख, उमेश खंदारे, इस्माईल संगम, विठ्ठल शिंदे, अर्जुन लांडगे, अबूबकर लांडगे, मेहबूब इनामदार, पांडुरंग जगताप, किरण नढे, मिलिंद फडतरे, नीरज कडू, डॉ. मनीषा गरुड, झुबेर खान, आशा भोसले, अण्णा कसबे, महानंदा कसबे, निर्मला खैरे, सीमा हलगट्टी, आकाश शिंदे, भारतीताई घाग, दीपक भंडारी,, नितीन खोजेकर, संदीप शिंदे, लक्ष्मण तुळसे, फिरोज तांबोळी, नंदा पुरोहित आदी उपस्थित होते.
यावेळी दिप्ती चवधरी म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने देश चालविला तर भाजप आता देश विकायला काढत आहे. देशातील महागाई, बेरोजगारी आणि जागतिक पातळीवर रुपयाचे अवमूल्यन या विषयावर नागरिकांचे लक्ष जावू नये यासाठी केंद्र सरकार ईडी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजपाचा अजेंडा राबवीत आहे अशीही टीका माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी केली.

यावेळी डॉ. कैलास कदम, मानव कांबळे, मारूती भापकर, नरेंद्र बनसोडे, निगार बारसकर, सायली, नढे, कौस्तुभ नवले, छाया देसले आदींनीही केंद्र सरकारच्या निषेधार्थ भाषण केले.