सोनिया गांधींची ईडी कार्यालयात चौकशी सुरु

0
317

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) नॅशनल हेराल्डप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केली जात आहे. यादरम्यान आज पुन्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी झाली. या चौकशी दरम्यान सोनिया यांच्या कन्या आणि कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत औषधे घेऊन त्यांच्यासोबत ईडी कार्यालयातील हजर होत्या.

महिला आधिकाऱ्याकडून सोनिया गांधींची चौकशी
सोनिया गांधी यांच्या चौकशीची कमानही देखील महिला अधिकारी मोनिका शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्या ईडीमध्ये अतिरिक्त संचालक पदावर कार्यरत आहेत.ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की 75 वर्षीय सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळेच प्रियांका गांधी यांनाही कार्यालयात राहण्याची परवानगी देण्यात आली असून सोनिया गांधी त्यांना औषधे आणि इतर गरजांसाठी भेटू शकतात. एवढेच नाही तर त्यांना विश्रांतीची गरज भासल्यास त्यासाठी त्यांना संधीही दिली जाईल.

चौकशीसाठी सोनिया गांधींच्या या आहेत मागण्या
काँग्रेस नेत्या आणि त्यांची कन्या प्रियंका गांधी यांनीही कार्यालयात हजर राहता यावे अशी परवानगी सोनिया गांधींनी ईडीकडे मागितल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, चौकशी खुल्या आणि हवेशीर खोलीत करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. याशिवाय चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची कोरोना चाचणीही व्हायला हवी. सोनिया गांधींना नुकतीच कोरोनाची लागण झाली होती आणि काही दिवसांपूर्वीच त्या बऱ्या झाल्या आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांचीही ईडीने सलग पाच दिवस चौकशी केली होती. मात्र, यावेळी सोनिया गांधींची फार काळ चौकशी होणार नसल्याचे बोलले जात होते. दरम्यान आज सोनिया गांधी यांची तीन-साडेतीन तास चौकशी करण्यात आली.