सोनिगरा सुपर किंग्ज संघाची विजयी सलामी

0
1

दि.०८(पीसीबी) – पिंपरी – चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने माण – हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट स्टेडियम येथे आयोजित पर्व दोन ‘ टी – २० प्रीमियर लीग ‘ या क्रिकेट स्पर्धेच्या

२० षटकांच्या सामन्यांचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

६/४/२०२६ – दुपारचे सत्र – सोनिगरा सुपर किंग्ज संघ आणि स्पोर्ट स्टोरीज अव्हेंजर संघ यांच्यात सामना झाला. या सामन्यात सोनिगरा सुपर किंग्ज संघाने ६ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. या सामन्यात श्रेयस केळकर सामनावीर ठरला.
सोनिगरा सुपर किंग्ज संघ – १९० धावा ४ बाद २० षटके. श्रेयस केळकर – ६३, ललित मुसळे – ५५, अजित गव्हाणे – ४४. वरून चौद्री – ५८/२,
स्पोर्ट्स स्टोरीज अवेंजर्स संघ १३.२ षटके सर्वबाद ८५ धावा:- निनाद सी २७, संकेत माने १० / २ .

७/४/२०२६ पहिल्या सत्रात विश्व टायगर्स आणि सह्याद्री किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यात सह्याद्री किंग्जने विश्व टायगर्सवर ८ गडी राखून विजय मिळविला. सुशांत अभंग सामनावीर ठरला.
विश्व टायगर्स संघ २० षटके ७ बाद १३७ धावा:- अदी – ४६, अथर्व भोसले ३४, प्रसन्न पवार – १७. रोहन खरात – १६/२, अनिश गायकवाड – २० / २,
सह्याद्री किंग्ज संघ १६.२ षटके २ बाद १३९ धावा :-सुशांत अभंग – ६१, वेदांत हंचे – ४२, अनिश गायकवाड – २२. मयूर वाघ – २ / १ .
सह्याद्री किंग्जच्या अद्वैत कोतवाल याला ‘ फायटर ऑफ द मॅच ‘ या किताबाने गौरविण्यात आले.