पुणे शहरात कोहिनुर ग्रुप तसेच मित्तल ग्रुप यांच्यावर इनकमटॅक्सचे छापे सुरू असतानाच दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील राकेश सोनिगरा यांच्या ‘ऑरेंज प्रॉपर्टीज’सह अन्य चार बांधकाम व्यवसायिकांवर छापे पडल्याची बातमी आहे. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती दिली जात नाही.
पिंपरी-चिंचवड मधील प्रख्यात बिल्डर राकेश सोनिगरा यांच्या ऑरेंज प्रॉपर्टीजसह अन्य चार बांधकाम व्यवसायिकांवर एकाच वेळेस आयकर विभागाने छापे टाकले. पुण्यातील दोन बड्या बांधकाम व्यवसायिका बरोबरीनेच मध्यरात्रीपासून पिंपरी चिंचवडमध्ये आयकर विभागाने तपासणी मोहीम राबवली.