सैन्य दलाच्या ट्रक चालकावर गुन्हा

0
78

शिरगाव, दि. 29 (पीसीबी) : सैन्य दलाच्या ट्रक चालकांनी निष्काळजीपणे वाहन चालविल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याने ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात रविवारी (दि. २७) सायंकाळी साडेसात वाजता गहुंजे येथे झाला.

प्रशांत रामचंद्र राणे (वय ४६, रा. वसई) यांनी या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सैन्य दलाच्या ट्रकवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे नातेवाईक त्यांच्या कारने गहूंजे येथून चालले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर सैन्य दलाचा ट्रक चालला होता. चालकांनी हा ट्रक निष्काळजीपणे चालविल्याने तसेच अचानक ट्रक थांबविण्याचे अपघात झाला. या अपघातात फिर्यादी व फिर्यादी यांची मावशी गंभीर जखमी झाली. तर, फिर्यादी यांचा मावसभाऊ प्रसाद नंदकिशोर कोलते याचा मृत्यू झाला. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.