सेवा, सुशासन व गरीब कल्याणासाठी भाजपाचे महा-जनसंपर्क अभियान

0
346

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – भारताते कर्तृत्ववान पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मोदी सरकारचे ऐतिहासिक निर्णय, विकास कामे व जनहितार्थच्या योजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, याकरिता देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये महा-जनसंपर्क अभियान (30 मे ते 30 जुन दरम्यान) मोदी@9 चे कार्यक्रम सुरू आहेत. याच अभियानाच एक भाग असलेले मोदी@9 अंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, पिंपरी व मावळ विधानसभेतील केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे लाभ मिळालेल्या “लाभार्थी मेळावा काळेवाडी येथिल ‘आरंभ बॅंक्वेट हॅाल’ मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी, प्रधान मंत्री आवास योजना, घरकुल योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री जन-धन योजना, प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना, आयुष्मान भारत योजना, आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, अटल पेंशन योजना यासह विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी ५५० लाभार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

राज्याचे माजी मंत्री व मोदी@9 चे मावळ लोकसभेचे संयोजक मा. बाळासाहेब भेगडे यांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, माजी राज्यसभा खासदार व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, चिंचवड विधानसभा प्रभारी व मा. नगरसेवक शंकरशेठ जगताप, आण्णासाहेब विकास महामंडळाचे मा. अध्यक्ष अमित गोरखे, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिवराव खाडे, मावळ लोकसभा लाभार्थी संयोजक व मा. सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, सरचिटणीस ॲड.मोरेश्वर शेडगे,व राजु दुर्गे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्वलाताई गावडे, पिंपरी विधानसभा संयोजक माऊली थोरात, मावळ विधानसभा किरण राक्षे, चिंचवड विधानसभा संयोजक गोपाळ मळेकर, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, सविताताई खुळे, उषाताई मुंढे, अश्विनीताई चिंचवडे, आरतीताई चौंधे, शारदाताई सोनावणे, निर्मलाताई कुटे, सुरेश भोईर, बाबा त्रिभुवन, भाजपा शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, स्विकृत सदस्य बिभीषण चौधरी व संदीप गाडे, थेरगाव काळेवाडी मंडलाध्यक्ष विनोद तापकिर, यासंह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व मावळ लोकसभेतील लाभार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी मा. राज्यसभा खासदार व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अमरजी साबळे, विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी लाभार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाची प्रस्तावना मावळ लोकसभा संयोजक व मा. सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके यांनी केली व मा. नगरसेवक माऊली थोरात व गोपाळ मळेकर यांनी सुत्रसंचालन केले.