सेवा पंधरवडा राज्यव्यापी सेवा प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहिती दालन…

0
2

माहिती व जनसंपर्क विभाग आणि विविध विभागाच्या वतीने नागरिकांना देण्यात आली सेवांची माहिती…


दि.१७(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे वतीने नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती देण्यासाठी आजपासून सुरू झालेल्या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत माहिती व जनसंपर्क विभाग आणि समाज विकास विभागाच्या वतीने गणेश कला-क्रीडा मंच येथे माहिती दालन उभारण्यात आले होते. येथे नागरिकांना महापालिकेच्या विविध सेवांची माहिती देताना त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर याकाळात महसूल विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात ‘सेवा पंधरवडा’ राबवण्यात येत आहे या सेवा पंधरवडाचा शुभारंभ आज पुणे येथील गणेश कला-क्रीडा मंच येथे झाला. याप्रसंगी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती देण्यासाठी येथे माहिती दालन उभारण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तर विविध विभागप्रमुख यांच्या विभागातील माहितीसह माहितीचे दालन देखील याठिकाणी उभारण्यात आलेले होते.

याठिकाणी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी महापालिकेच्या वतीने नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा व सुविधांची माहिती दिली,दरम्यान यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर,आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांच्यासह विविध शासकीय अधिकारी,कर्मचारी व नागरिकांनी दालनास भेट दिली.

या सेवा सुविधांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था अंतर्गत घरगुती व व्यावसायिक पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण प्रकल्प, जलसाठा व पाईपलाईन व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घराघरातून कचरा संकलन, वर्गीकरण, वाहतूक, प्रक्रिया व वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट, सांडपाणी व मलनिस्सारण व्यवस्था अंतर्गत गटार जाळे, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (STP), नालेसफाई व स्वच्छता, रस्ते व पूल अंतर्गत मुख्य रस्ते, गल्लीनाले, उड्डाणपूल, पदपथ, बस थांबे आणि रस्त्यावरील दिवे (स्ट्रीट लाईट), आरोग्य सुविधा अंतर्गत महापालिकेची दवाखाने, रुग्णालये, दवाखाने (UPHC), आरोग्य मोहिमा व प्रतिबंधात्मक लसीकरण शिक्षण सुविधा अंतर्गत महापालिकेची शाळा, माध्यमिक शाळा, डिजिटल शिक्षण व शैक्षणिक साहित्य सार्वजनिक स्वच्छता अंतर्गत सार्वजनिक शौचालये, महिलांसाठी विशेष सुविधा, स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपक्रम, पर्यावरण व हरित उपक्रम अंतर्गत उद्याने, बागा, वृक्षारोपण, तळे-सरोवर संवर्धन, बायो-डायव्हर्सिटी पार्क, गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधारणा अंतर्गत पीएमएवाय (प्रधानमंत्री आवास योजना), पुनर्वसन प्रकल्प वाहतूक सुविधा अंतर्गत पीएमपीएमएल बससेवा (सहभाग), बीआरटी कॉरिडॉर, वाहतुकीस पूरक अधोसंरचना, अग्निशमन सेवा अंतर्गत अग्निशमन केंद्रे, आपत्कालीन बचावकार्य, सामाजिक व सांस्कृतिक सुविधा अंतर्गत सामुदायिक सभागृहे, क्रीडांगणे, ग्रंथालये, सांस्कृतिक केंद्रे, कर व परवाना सेवा अंतर्गत ऑनलाइन कर भरणा, परवाना नोंदणी, इमारत परवानगी तर ई-गव्हर्नन्स व ऑनलाइन सेवा अंतर्गत तक्रार निवारण प्रणाली, ऑनलाइन अर्ज यांसह वेबसाईट,संपर्क क्रमांक याबाबत माहिती देण्यात आली.