सेवालाल महाराज जयंती महापालिकेत साजरी

0
248

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – संत सेवालाल महाराज हे पर्यावरण संरक्षणासाठी सतत कार्यरत असणारे थोर समाजसुधारक होते. त्यांनी मानवता, सत्य, अहिंसा तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वांना दिला. समाजातील व्यसनाधीनता, अनिती तसेच अंधश्रद्धा निर्मुलनासाठी मह्तवपूर्ण कार्य केले असून त्यांचे प्रबोधनात्मक विचार भावी पिढीने जोपासले पाहिजेत, असे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.

संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार चव्हाण,नितीन चव्हाण,प्रेमकिसन राठोड,अमोल पवार,सुभोद पवार,गौतम तायडे,सौरभ चव्हाण, किशोर चव्हाण, माया वाकडे,विनय राठोड, रावसाहेब राठोड,रमेश राठोड,प्रतिक राठोड,सुभाष चव्हाण, संतोष चव्हाण,श्रावण चव्हाण,रवि राठोड,सुनिल राठोड,अविनाथ राठोड,आनंद जाधव, राम राठोड सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका राठोड तसेच महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.