सेवाभाव , बंधूता , मानवता ईस्लामची शिकवण प्रत्येकांने अंगीकारावी : मुफ्ती मौलाना मिनाज शेख यांचे आवाहन

0
26

चिंचवड ३१ ः पिंपरी चिंचवड शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. भोसरी, घरकुल, निगडी, चिंचवड, आकुर्डी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, पिंपरी, काळेवाडी, नेहरूनगर, कासारवाडी, दापोडी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, रावेत परिसरात ईदची नमाज सकाळी 8 ते 10 दरम्यान विविध मशिदीत, मदरसा ,ईदगाह मैदानात धर्मगुरू मुफ्ती, मौलाना, हाफीज साहब यांनी मुस्लिम बांधवांना नमाज पढविला. चिंचवड परिसरात चिंचवडगाव-आलमगीर शाही मशीद, ( इदगाह मैदान ) येथे मौल्लाना मिनाज शेख , मौल्लाना इनामुल हक, यानी नमाज पढविला . चिंचवड स्टेशन-मजीद ए अम्मार- येथे हाफीज मौन्नूद्दीन, मोहननगर-मजीद ए हिदायतूल मुस्लमीन-हाफिज वसीम साहब, विद्यानगर-मजीद ए अक्सा-मौल्लाना इम्रान मोन्नुद्दीन साहब, आकुर्डी-मजीद ए मदिना, आकुर्डी-मजीद ए अक्सा, काळभोरनगर-मजीद ए फारूकीया-, बिजलीनगर-मजीद ए नूरईलाई, वाल्हेकरवाडी-मजीद ए बीसाल चिंचवडेनगर-मजीद ए हुसैनी , दळवीनगर-मजीद ए बीसाल, मदिना मजीद , पिंपळे गुरव, जमातूल मुस्लिम जामा मस्जिद, कासारवाडी, दारूल उलम इशातुल इस्लाम मदरसा, मजीदे बिलाल अंजुमन तालीमूल इस्लाम ,विकास नगर, कासारवाडी ,अंजुमन गुलशन हे मदिना मदरसा, कासारवाडीत तवकल्ला जामा मजीद , नेहरूनगर , नेहरूनगर ईदगाह मैदान आदी ठिकाणी मुस्लिम बांधवांना मौलाना व हाफीज यांनी रमजान ईद ची नमाज नमाज पढविला.
अल्लाहाचा आज्ञेप्रमाणे शहरातील सर्व वयोगटातील मुस्लिम बांधव व महिलांनी 30 दिवसांचे उपवास त्यांच्या क्षमतेनुसार केले. मोठया संख्येने दिवसभरात पाच वेळा नमाज पठण केले. दररोज संध्याकाळी रोजा इफ्तारी (रोजा सोडण्याची) वेळ झाल्यानंतर सामुहीकरित्या करून रात्री तराबी नमाजमध्ये पवित्र कुराणचे पठण मुफ्ती ,मौल्लाना यांनी नमाज पढविला . शहरात त्याला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला . चंद्रदर्शन झाल्यानंतर आज सकाळी मुस्लिम बांधव नवीन कपडे, पारंपारिक वेशभूषा परिधान करून, सुवासीक तेल व अत्तर लावुन रमजान ईद ची नमाज पठण पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी केले. चिंचवड गांव येथे चिंचवड प्रवासी संधाचे अध्यक्ष गुलामअली भालदार , इक्बाल काझी यांनी मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या .
चिंचवडगाव येथील मशिदीत रमजान महिन्यात शेवटच्या दहा दिवस संसारापासून दूर राहात मशिदीत अल्लाचे नामस्मरण, नमाजपठण, प्रा वास तीन जणांनी केले, त्या प्रित्यर्थ आज ईद चे निमित्ताने त्यांच्या मौलानांच्या हस्ते मेहबूब बागवान, असलम शेख, नाझीम शेख, सद्दाम शेख यांचा चिंचवड गाव येथील ईदगाह मैदानावर सत्कार करण्यात आला. तसेच विविध वृत्तपत्राचे छायाचित्रकार यांचा देखील सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष इमरान पानसरे, अख्तर पिंजारी, मतीन पानसरे, आसिफ शेख, शाही नदाफ, हाजी अत्तार जी .ए . यांनी केले.
निगडी येथील नुरानी मजीद मध्ये मुजीब शेख, लियाकत शेख, रशीद शेख, समद यांनी मदत केली .
विविध ठिकाणी नमाज पठण सामुहीकरित्या पार पडल्या, त्यावेळी धर्मगुरु मुफ्ती, मौल्लाना, हाफिज साहब यांनी अल्लाहाची शिकवण आहे. सर्वांवर प्रेम करा, रमजान ईद सर्वांना आदर करण्यासाठी एकत्रित काम करण्याची प्रेरणा देण्याचा सण आहे. ईदच्या नमाज पठणानंतर एकमेकांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोणाचाही द्वेष करू नका, एकात्मता व बंधुत्वाची कास अंगीकारून एकत्रित आपली दिनचर्या पार पाडा. मुलांना शिक्षण देऊन त्यांना भावीकाळात आदर्श नागरिक कसे करता येईल. मुलांनी देखील आपल्या आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संदेश यावेळी धर्मगुरू करवी देण्यात आला. तसेच, रमजान ईदमध्ये गरजूंना मदत करण्यासाठी जकात दिली जाते, दान केले जाते. प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपल्या उत्पन्नाचे अडीच टक्के रक्कम, धान्य गरिबांसाठी दान केले पाहिजे, असा नियम असल्यामुळे अनेक बांधवांनी दिनदुबळ्या, सामाजिक आर्थिक उपेक्षितांना दान करून आपली जबाबदारी पार पाडून आज ईदच्या दिवशी शिरखुर्मा एकमेकांना घरी जाऊन त्याचा आस्वाद घेतला. त्यात सर्व धर्मियाचा समावेश होता . अनेकांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा मोबाईलद्वारे , मेसेज करून प्रत्यक्ष संभाषण करून दिल्या, सर्वठिकाणी ईद साजरी करण्यासाठी विविध मशीदीचे पदाधिकारी व मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले. पोलीसांनी सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवल्या बद्दल मुस्लिम बांधवांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांचे विशेष आभार मानले.