दि.७(पीसीबी)-चिखली कुदळवाडी येथील जेष्ठ कार्यकर्ते आणि सेवादलाचे माजी शहराध्यक्ष आनंदा गेनभाऊ यादव (वय-६५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे परिवार असा परिवार आहे.
माजी आमदार विलास लांडे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांचा परिचय होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि आमदार महेश लांडगे यांच्या प्रचाराची धुरा सांभळली. महापालिका वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यपदावर त्यांनी काम केले.












































