राष्ट्रीय पातळीवरच्या सौंदर्य स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या दीपाली करमुसे पहिली उपविजेती

0
294

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – गौरा फॅशन क्लब प्रेझेट्स ” सेलेस्टीयल ब्यूटी अँण्ड हेरॉईक मॅन ऑफ द ग्रेट भारत २०२३ (सीझन ४) या नेशनल लेव्हलच्या सौंदर्य स्पर्धेचा सोहळा सयाजी हॉटेल , कोल्हापूर येथे मोठ्या दिमाखात ९ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाला. मिसेस कॅटेगरी मध्ये पिंपरी चिंचवडच्या (महाराष्ट) दिपाली करमुसे ठरली पहिली उपविजेती.

संजय घोडावत ग्रूप चे चेअरमन श्री संजय घोडावत, ट्रस्टी श्री विनायक भोसले, सरस्वती साडी डेपो चे संचालक श्री शंकर दुल्हानी, आर्यन दुल्हानी, माणिकचंद आटा ग्रूप चे श्री प्रकाश आर. धारीवाल, श्री गिरीश शहा व फॉर्चून ग्रूप चे चेअरमन श्री वीरेन शहा यांच्या सहयोगाने सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे ६,७,८ जानेवारीला तिन दिवसांचे ग्रूमिँग गौरी नाईक व पेजन्ट कोच चैतन्य गोखले यांच्याकडून घेण्यात आले. व ग्रँड फीनालेचा सोहळा ९ जानेवारी ला संपन्न झाला. संपूर्ण भारतातून 300 ऑडिशन्स घेण्यात आले व त्यातून अंतिम 36 स्पर्धकांची निवड करण्यात आली.

रजनीश दुग्गल (मि.इंटरनेशनल , ग्रासिम मि.इंडिया २००३), मिलिंद गुणाजी (अभिनेता, मॉडेल), डॉ. श्रद्धा जवानजाल (प्रेसीडेंट सहारा नर्सिग एजुकेशन), सीमा अनिल इन्ग्रोले (चेअरमन SDR फाउंडेशन) व गौरी नाईक (फाउंडर डाइरेक्टर, गौरा फॅशन क्लब) यांनी परीक्षकांचे काम पाहिले तसेच श्री भारत सुरती (जेड ब्लू) यांनी मेन्स लाइफ स्टाइल पार्टनर व एफ हीना ब्युटीक चे संचालक श्री सायपन इनामदार यांनी लेडीज डिज़ाइनर पार्टनर म्हणून सहकार्य केले. मेकअप पार्टनर म्हणून LTA स्कूल ऑफ ब्यूटी चे संचालक वैशाली के .शहा , बिजू नायर व सेलेब्रिटी मेकअप आर्टिस्ट सुप्रिया शिंदे यांनी काम पाहिले तसेच संदीप पाटील व स्वाती बाल्टे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली.

भारत सुरती (जेड ब्लू), डॉ अजित राजीगरे (सार्थ आयुर्वेदा), बाबुराव चव्हाण (धनलक्ष्मी ज्वेलर्स), शैलेजा दुनुन्ग (हॉटेल संस्क्रुती) यांनी सर्व स्पर्धकांना भेट वस्तू दिल्या. या चार दिवसीय फॅशन शो चा समारोप झाला असून मिस गटामध्ये कोलकत्ता (पश्चिम बंगाल) येथील टिटास चॅटर्जी विजेती ठरली, पाहिली उपविजेती श्रुती साळवे अहमदनगर (महाराष्ट्र) तर दुसरी उपविजेती इशा भोसले कोल्हापूर (महाराष्ट) ठरली, मिस्टर गटामध्ये उस्मानाबाद (महाराष्ट्र) येथील आरेफ़अलि कोटवाल विजेता ठरला, पाहिला उपविजेता सातारा (महाराष्ट्र ) येथील आदित्य धानधरपाळे तसेच कोल्हापूर ( महाराष्ट्र ) येथील रुद्र श्रावस्ती दुसरा उपविजेता ठरला.

मिसेस गटामध्ये नाशिक ( महाराष्ट ) येथील नयना बोडके विजेती ठरली, पाहिली उपविजेती दिपाली करमुसे पुणे (महाराष्ट्र) तसेच दिल्ली येथील मनीषा वर्मा दुसरी उपविजेती ठरली. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्याचा गौरव करण्यात आला. गौरा इवेंट्सच्या संचालिका गौरी नाईक व संचालक जयंत पाटील यांनी सर्व स्पर्धकांचे व कार्यक्रम यशस्वीते साठी प्रायोजक व उपस्थित मान्यवरांचे यावेळी आभार मानले.