सेलिब्रेटिंना फॉलो करा अन 30 टक्के नफा मिळवा म्हणतमहिलेची पावणे नऊ लाखांची फसवणूक

0
184

हिंजवडी ,दि. 25 (पीसीबी) – इन्स्टाग्रामवर सेलिब्रेटींनी फॉलोकरा व 30 टक्के नफा मिळवा असे आमिष दाखवून दोघांनी महिलेकडून तब्बल पावणे नऊ लाखरुपये उकळले आहेत. हा प्रकार 6 मे ते 9 मे या कालावधीत हिंजवडी येथे घडला आहे. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याददिली असून टेलिग्राम युजर्स आनाया शर्मा व आरना खत्री यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यातआला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनाआरोपींनी टेलीग्रामद्वारे संपर्क साधला. त्यानी फिर्यादीला सेलेब्रिटींना फोलोकरायला सांगितलेव वेळोवेळी पैस गुंतवण्यास सांगितले. यातून 30 टक्के जास्त फायदामिळेल असे आमिष दाखवले. मात्र फिर्यादी कडून 8 लाख 75 हजार रुपये घेत याचा कोणताहीनफा परत केलेला नाही. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढिलतपास करत आहेत.