सेन्सेक्स १,१०० अंकांनी कोसळला, निफ्टी तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

0
2

दि.२२(पीसीबी)-भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक घसरले असून, गुंतवणूकदारांची सुमारे ₹10 लाख कोटींची संपत्ती नष्ट झाली आहे.सोमवारच्या घसरणीनंतर आजही बाजारावर विक्रीचा दबाव कायम राहिला.सेन्सेक्स 1,065 अंकांनी घसरून 82,180 वर बंद झाला, तर व्यवहारादरम्यान तो 1,235 अंकांनी घसरला.निफ्टी 353 अंकांनी घसरून 25,232 वर बंद झाला, ही 7 एप्रिलनंतरची सर्वात मोठी एकदिवसीय घसरण ठरली आहे.निफ्टीने 15 ऑक्टोबरनंतरची नीचांकी पातळी गाठली आहे.निफ्टी50 मधील बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व आणि ETERNAL हे शेअर्स मोठे घसरले, तर NTPC आणि हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये मर्यादित वाढ दिसून आली.तांत्रिक विश्लेषकांच्या मते, निफ्टीसाठी 25,100 ते 25,150 ही महत्त्वाची आधार पातळी आहे. ही पातळी टिकली, तर अल्पकालीन सुधारणा संभवते; मात्र सध्या बाजाराचा कल नकारात्मक असल्याचं सांगण्यात येत आहे.

आज बाजाराची एकूण स्थिती नकारात्मक राहिली.818 शेअर्स वाढले, तर 3,031 शेअर्स घसरले.ब्रॉडर मार्केटमध्येही मोठी पडझड झाली.मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 3 टक्क्यांपर्यंत घसरले, तर काही शेअर्समध्ये 12 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.बाजार घसरण्यामागे अनेक कारणं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता,परदेशी गुंतवणूकदारांची सातत्याने सुरू असलेली विक्री,कमजोर तिमाही निकाल,जागतिक बाजारातील घसरण,रुपयाचा विक्रमी नीचांकआणि निफ्टीची साप्ताहिक एक्सपायरीया सर्व घटकांचा बाजारावर परिणाम झाला.

बाजार घसरण्याची 10 प्रमुख कारण
1) व्यापारयुद्धाची भीती

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाल्याने जागतिक बाजारात विक्रीचा दबाव वाढला. अमेरिका-युरोपमधील व्यापार तणावाच्या भीतीने भारतीय बाजारावरही परिणाम झाला.

2) FII ची सातत्याने विक्री

परदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी ₹3,262 कोटींची विक्री केली. हा महिन्यातील सलग 10 वा विक्रीचा दिवस ठरला असून, यामुळे बाजारावर मोठा दबाव आला.

3) संमिश्र Q3 निकाल

काही मोठ्या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमजोर राहिले.
विशेषतः विप्रोच्या कमजोर मार्गदर्शनामुळे IT क्षेत्रात मोठी विक्री झाली.

4) कमजोर जागतिक संकेत

आशियाई बाजारांमध्ये कोस्पी, निक्केई, शांघाय आणि हँगसेंग निर्देशांक घसरले. युरोपियन बाजारही 1 टक्क्यांहून अधिक घसरणीत होते.

5) इंडिया VIX मध्ये वाढ

बाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक India VIX 7 टक्क्यांनी वाढून 12.73 वर गेला, जो गुंतवणूकदारांमधील भीती दर्शवतो.

6) रुपयाची घसरण

रुपया डॉलरच्या तुलनेत 7 पैशांनी घसरून विक्रमी 90.97 वर बंद झाला. यामुळे परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी कमी झाला.

7) ट्रम्प काळातील टॅरिफवर US सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा संभाव्य निर्णय बाजारासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, अशी गुंतवणूकदारांची चिंता आहे.

8) कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

ब्रेंट क्रूड USD 64 प्रति बॅरल पर्यंत वाढल्याने महागाई आणि वित्तीय तुटीची चिंता वाढली.

9) निफ्टी वीकली एक्सपायरी

मंगळवारी निफ्टीची साप्ताहिक एक्सपायरी असल्याने डेरिव्हेटिव्ह व्यवहारांमुळे बाजारात तीव्र चढ-उतार झाले.

10) PSU बँक निर्देशांकात घसरण

PSU बँक निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरला.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँक हे शेअर्स 3 टक्क्यांपर्यंत घसरले.