सेन्ट्रिंग प्लेटा गाडीत भरण्यावरून वाद; मजुराला कोयत्याने मारहाण

0
159

सेन्ट्रिंग प्लेटा गाडीत भरण्यावरून वाद घालत दोघांनी मिळून एका मजुराला कोयत्याने, लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 19) सकाळी सव्वा नऊ वाजता मावळ तालुक्यातील इंदोरी येथे घडली.

आदरेश हरिद्वार यादव (वय 38, रा. इंदोरी, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह हनुमंत हरिद्वार यादव (वय 27, रा. इंदोरी, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुभाष हनुमंत सप्रे (वय 27, रा. करंजविहीरे, ता. खेड) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे मालक बंडू जाधव यांनी आरोपींना सेन्ट्रिंग प्लेटा भरण्यासाठी बोलावले होते. प्लेटा घेण्यावरून आरोपी आणि त्यांचे मालक जाधव यांच्यात वाद झाला. बंडू जाधव यांनी फिर्यादी सप्रे आणि प्रकाश जाधव यांना सेन्ट्रिंग प्लेटा आपल्या गाडीत भरण्यास सांगितले. फिर्यादी हे काम करत असताना आरोपी हनुमंत यादव याने कोयत्याने सप्रे यांना मारहाण केली. आदरेश याने लाकडी दांडक्याने मारहाण करून लाथ मारत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.