सेन्टोसा गेस्ट हाउस मधून दीड लाखांचे दागिने चोरीला

0
234

दि २६ मे (पीसीबी ) – किवळे येथील सेन्टोसा हॉटेलच्या गेस्ट हाउस मधून अज्ञात व्यक्तीने एक लाख 46 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 19 मे रोजी दुपारी घडली.

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुंबई-बेंगलोर महामार्गावर येथील सेन्टोसा हॉटेल मध्ये गेस्ट हाउस मध्ये थांबल्या होत्या. त्यांच्या खोलीच्या उघड्या दरवाजा वाटे आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांचे एक लाख 46 हजार 490 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.