सेंटोसा वॉटर पार्क मधील स्विमिंग पुलमध्ये बुडून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

0
503

रावेत, दि. १५ (पीसीबी) – सेंटोसा वॉटर पार्क मधील स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 12) दुपारी दोन वाजता घडली.

याप्रकरणी सेंटोसा वॉटर पार्कचे मॅनेजर अजय हरीलाल हिंदुजा (रा. पिंपळे सौदागर), राहुल आबा मोरे (रा. रावेत), भगवान काळे (रा. शेळके वस्ती, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार राकेश पालांडे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगी, तिची आणि आणि भाऊ यांच्यासोबत सेंटोसा वॉटर पार्क येथे पिकनिकसाठी आले होते. वॉटर पार्कच्या परिसरात खेळत असताना एका स्विमिंग पुल मध्ये बुडून मुलीचा मृत्यू झाला. सेंटोसा वॉटर पार्कचे मालक आणि मॅनेजर यांनी लहान मुलांच्या दृष्टीने सुरक्षेची काळजी न घेतल्याने ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.