सुहास दिवसे पुणे जिल्हाधिकारीपदी

0
353

पुणे, दि. ७ (पीसीबी) राज्यात लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात मोठे बदल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ५८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर आता पुणे जिल्हाधिकारी यांची बदली करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सुहास दिवसे, भा. प्र . से. यांची पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

सुहास दिवसे हे याआधी क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदी कार्यरत होते. डॉ. राजेश देशमुख हे आता सुहास दिवसे यांच्या जागी क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळतील.