सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेले हेलिकॉप्टर क्रॅश

0
142

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या.

अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये ही घटना घडली. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुषमा अंधारे महाडमधून बारामतीकडे हेलिकॉप्टरने जाणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर आल्या होत्या. हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी ते कोसळले. लोकसभा निवडणुकीत अंधारे या महायुतीच्या स्टार प्रचारक आहेत. महाड येथून त्या बारामती येथे हेलिकॉप्टरमधून जाणार होत्या.