सुषमा अंधारे यांच्या विरोधात शिंदे गटाचे ज्योती वाघमारे अस्त्र

0
187

पिंपरी, दि. २५ (पीसीबी)- दसरा म्हटलं की शिवसेनेचा मेळावा. या मेळाव्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येत असतो. दरम्यान शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन वेगवगळे मेळावे सुरु झाले. यंदाही ठाकरे गटाचा मेळावा हा शिवतीर्थावर तर शिंदेंचा मेळावा आझाद मैदानावर पार पडला. दोन्ही गटाच्या शिलेदारांनी एकमेकांवर सडकून टीका केली. पण दोन्ही गटाच्या या मेळाव्यात भाषणे गाजली ती दोन महिलांचीच. शिवतिर्थीवरील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुषमा अंधारे यांची तोफ भाजपच्या दिशेने धडाडली. त्याचवेळी तिकडे आझाज मैदानात एकनाश शिंदेंच्या शिवसनेकडून सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांनी जशास तशा भाषेत उत्तर देत दसरा मेळावा चांगलाच गाजवला. आता या ज्योति वाघमारे कोण याचीच चर्चा सुरू आहे.

उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत , आदित्य ठाकरे आणि महत्वाच म्हणजे सुषमा अंधारे या सगळ्यांना त्यांनी फैलावर घेतलं आणि सडकून टीका केली. असं म्हटलं जात की, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात दसऱ्याच्या मुहूर्तावर शिंदेंनी ज्योती वाघमारे नावाचं शस्त्र बाहेर काढलंय. त्यामुळे जाणून घेऊ कोण आहेत ज्योती वाघमारे.
ज्योती वाघमारे या प्राध्यापक आहेत. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. सोलापुरातील आंबेडकरी चळवळीतील त्या आक्रमक चेहरा आहेत. ज्योती वाघमारेंचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते आहेत. नागनाथ वाघमारे हे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे. पण नंतर चळवळीत काम केल्यानंतर ते देखील राजकारणात उतरले. सोलापूर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिलं.

वडिलांनंतर ज्योती वाघमारे देखील राजकारणात आल्या. अंधारेंसारख्या वाघमारे देखील तडफदार वक्त्या आहेत. वाघमारेंच्या या कौशल्यामुळे सुशीलकुमार शिंदेंनी त्यांची सोलापुर महिला शहराध्यक्षपदी निवड केली होती. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विधानसभा निवडणूकीची धुरा वाघमारेंनी संभाळली होती. या दरम्यान ज्योती वाघमारे वंचित बहुजन आघाडीच्या मंचावर देखील दिसल्या होत्या. त्यामुळे त्या वंचितसोबत जाण्याची चर्चा रंगली होती.