सुवर्णयुग सहकारी बँक प्रा. लि. ला भारतीय रिझर्व बँकेने ठोठावला १ लाख रुपयांचा आर्थिक दंड

0
219

पुणे, दि.४ (पीसीबी) पुण्यातील सुवर्णयुग सहकारी बँक प्रा. लि. ला भारतीय रिझर्व बँकेने १ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २७ एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या नोटीसनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील सुवर्णयुग बँकेवर आरबीआयची कारवाई

सुवर्णयुग बँकेला ठोठावला १ लाख रुपयांचा आर्थिक दंड
पुण्यातील सुवर्णयुग सहकारी बँक प्रा. लि. ला भारतीय रिझर्व बँकेने १ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २७ एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या नोटीसनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

आरबीआयव्दारे जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्यात सुवर्णयुग बँकेला अपयश आले आहे. त्यामुळे आरबीआयने कलम ४६ (४) (i) आणि बँकिंग नियमन कायदा १९४९ (अधिनियम) च्या कलम ५६ सह कलम ४७ A (१) (c) मधील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे

.पुण्यातील सुवर्णयुग बँकेत असणारी ठेवीदारांची रक्कम किमान रकमेपेक्षाही कमी होती. किमान रकमेपेक्षा ठेवीदारांची रक्कम कमी असल्यास संबंधित बँकेला दंड ठोठावला जातो. सुवर्णयुग बँकेचा याबाबतचा अहवाल आरबीआयने ३१ मार्च २०२१ रोजीच मागवला होता. या अहवालात सुवर्णयुग बँकेतील किमान रक्कम कमी असल्याचे समोर आले होते. त्यानुसार २० एप्रिल २०२३ रोजी बजावलेल्या नोटीसीनुसार बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.