सुरक्षित वाहतुकीसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचा उपक्रम

0
65

चिंचवड, दि. १३ (पीसीबी)

सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व समजण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी एक उपक्रम हाती घेतला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन एका क्रेनमध्ये ठेवून वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

उपक्रमाचे उद्घाटन पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाहतूक नियोजन विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरीचे प्रमुख डॉ. व्यास मौर्या, अमोल मुळे, सुमित चौधरी, अमोल कवडे उपस्थित होते.

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व आणि नागरिकांच्या कल्याणासाठी असे उपक्रम राबविणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या मोहिमेद्वारे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षित वाहतूक अभियानाची मदत होईल, असेही बांगर म्हणाले.

नागरिकांनी आपल्या ताब्यातील वाहने सुरक्षितपणे चालवावीत. वाहन चालवताना स्वतःची आणि इतरांची खबरदारी घ्यावी. त्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे सर्वात आवश्यक आहे. वाहतुकीच्या नियमांचे प्रत्येकाने पालन केल्यास रस्त्यावरील अपघात कमी होतील. तसेच अपघातांमध्ये नागरिकांचा नाहक बळी जाणार नाही.