सुरक्षा रक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून ठेवले बांधून, जबरदस्तीने कंपनीतून ८०० किलो भंगार नेले भरून

0
241

चाकण, दि. १८ (पीसीबी) – कंपनीत जबरदस्तीने येऊन सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून एकास बांधून ठेवले. त्यानंतर टेम्पो आणून कंपनीतील ८०० किलो भंगार साहित्य टेम्पोत भरून जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १७) पहाटे दावडमळा चाकण येथील टेक्नोड्राय सिस्टीम इंजिनिअरिंग प्रा ली या कंपनीत घडली.

गोरक्षनाथ गोविंद गायकवाड (वय ३६, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलनवाज मोहम्मद शफिखान, वय ५४, रा. बिरदवडी, ता. खेड. मूळ रा. बिहार) याला पोलिसांनी अटक केली आहे. दिलनवाज याच्यासह त्याच्या पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलनवाज हा टेक्नोड्राय सिस्टीम इंजिनिअरिंग प्रा ली या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याने शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास कंपनीत येऊन एका सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून कंपनीचे गेट उघडले. दुसरा सुरक्षा रक्षक नामदेव मरिबा भोगे याला धमकी देऊन दोरीने बांधून एक टेम्पो कंपनीत आणला. कंपनीतून ७०० किलो स्टेनलेस स्टील आणि १०० किलो माईलड स्टील असे एकूण ९१ हजार ३०० रुपये किमतीचे ८०० किलो भंगार साहित्य जबरदस्तीने चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.