सुरक्षा कठड्याला धडकून दुचाकी स्वाराचा मृत्यू

0
334

ताथवडे, दि. १२ (पीसीबी) – वेगात येऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी सुरक्षा कठड्याला धडकल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे.हा अपघात रविवारी (दि.10) पहाटे ताथवडे येथील महामार्गावर झाला आहे.

प्रथमेश पुंडलिक मटाले (वय 21 रा. वडगाव,पुणे) हा या अपघातात मयत झाला आहे.याप्रकरणी पोलिस हवालदार मच्छिंद्र काळे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बेदरकारपणे व वेगात दुचाकी चालवत होता. यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले घसरत जाऊन तो जोरात रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी सुरक्षा रक्षक कठड्याला जाऊन धडकला. यात त्याला गंभीर दुखापत झाली व तो मयत पावला. यावरून हिंजवडी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.