सुमन काळे यांना आदर्श माता पुरस्कार प्रदान

0
6

दि. 14 (पीसीबी) – राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा आदर्श माता पुरस्कार यंदाच्या वर्षी सुमन काळे यांना प्रदान करण्यात आला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त याचे आयोजन करण्यात आले होते पुणे येथील लालमहाल येथे आदर्श माता पुरस्काराने काळे यांना सन्मानित करण्यात आले. समाजसेविका प्रभाग सचिव योगिता निकम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी उद्योजक संतोष सिताराम बारणे माजी नगरसेवक गणेश धावडे युवराज दिसले सुशिल पवार मुकेश यादव प्रशांत धुमाळ मधुकर जाधव योगेश समेळ स्मिता पवार मंजिरी कोतुळे वैष्णवी किराड यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सुमन काळे यांनी मोठ्या कष्टाने आपल्या कुटुंबाचा डोलारा उभा केला मुलांना सामाजिक आणि इतर विविध क्षेत्रात यशस्वी होण्यात मोठा वाटा उचलला त्यांच्या या कामाची दखल घेत सुमन काळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांच्या त्या आई आहेत.