सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय कार्यकारी संस्था नवी सांगवी पुणे यांच्यावतीने भगवान गौतम बुद्ध जयंती विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी

0
108

दि २६ मे (पीसीबी ) – यांच्या विद्यमाने जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुनी तथागत गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंती निमित्त परिवर्तनवादि, विज्ञावादी, व समतेचा विचार पेरणाऱ्या सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, अहिल्या देवी होळकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संयुक्त जयंती महोत्सवातून विनम्र अभिवादन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर सन्मानितांच्या गौरव सोहळ्यातून श्री अरुण पवार (वृक्षमित्र) विनायक बडदे, (सर्पमित्र) यशोधरा नितनवरे, संतराम निकाळजे, विजय चौधरी, शिवानंद तालीकोटी यांचा भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देऊन सन्मान करण्याल आला. याप्रसंगी प्रकाश खुड़े, महेंद्र कदम, अॅड. वसंत जाधव, गौतम डोळस, सुरेंद्र जाधव, निखिल चव्हाण, गजानन कांबळे, मानसिंग कांबळे, उज्वला जाधव, भारती भालेराव, विजया सोंडे, इंदुमती पवार, सुरेखा कनवाळू, उषा शिंदे, शोभा सावंत, मिरा शिंदे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यास. मगन सावंत, दिलीप शेलार, हनुमंत सोनावणे, सुनील जावळे, सिद्धार्थ मराडे, गुलाब गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी प्रा. महादेव रोकडे यांची
बुध्द त्यानेही वाचला
आणि बुध्द
मी सुध्दा वाचला llll फरक मात्र एवढा ll तो बुध्दाला फक्त
शांतीचं प्रतीक समजतो
आणि मी क्रांतीचं,llll बुध्द त्याच्याही घरात आहे ll आणि बुध्द माझ्याही घरात आहे फरक मात्र एवढा तो बुध्दाला फक्त डोळे मिटलेला समजतो आणि मी डोळस llll बुध्द त्याच्याही मनात आहे
आणि बुध्द माझ्याही मनात आहे
फरक मात्र एवढातो बुध्दाला फक्त
हिंसेच्या विरुध्द समजतो आणि मी न्यायाच्या बाजुचा lllll बुध्द त्याच्याही डोक्यात आहे आणि बुध्द
माझ्याही डोक्यात आहे
फरक मात्र एवढातो बुध्दाला फक्त
तपस्वी समजतो आणि मी
वैज्ञानिक दृष्टीकोणाचा जनक llll
बुध्द त्याच्याही दृष्टीत आहे आणि बुध्द माझ्याही दृष्टीत आहे
फरक मात्र एवढा llll तो बुध्दाला फक्त धर्मसंस्थापक समजतो
आणि मी मानवतेचा संदेश llll
बुध्दाला भगवान तोही म्हणतो
आणि बुध्दाला भगवान मीही म्हणतो
फरक मात्र एवढा तो भगवान शब्दाचा अर्थ ईश्वर समजतो आणि मी भगवा रूप असलेला त्यागी
शेवटी खंत मात्र एवढीच lllll तो तथागत बुध्दाला जणु विष्णुचा नववा अवतार मानून मोक्षदाता समजतो
आणि मी बुध्दाला मानवाच्या पोटी पुत्र मानून अत्त दिप भवं सांगणारा
मार्गदाता समजतो…!!
हि कविता उपस्थितांची दाद देऊन गेली.