सुभेदार यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथी साजरी

0
281

आळंदी,दि.३०(पीसीबी) : होळकर घराण्याचे प्रमुख वीरयोद्धा सुभेदार यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथी आळंदीत होळकर यांचे प्रतिमा पूजन, पुष्पहार अर्पण करीत अभिवादन आणि कार्याचे स्मरण करीत साजरी करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस भागवत काटकर यांचे हस्ते प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी एल्गार सेना आळंदी शहर अध्यक्ष बाळासाहेब कवळासे, आळंदी शहर यशवंत संघर्ष सेना अध्यक्ष एकनाथ म्हस्के, आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर पत्रकार, नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भागवत काटकर, सामाजिक कार्यकर्ते गोविंद ठाकूर पाटील, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, हमीद शेख, विधीतज्ञ सूर्यकांत चौधरी, सुरक्षा रक्षक माउली शेखर आदी उपस्थित होते.

सुभेदार यशवंतराव होळकर यांचे स्मृती दिना निमित्त उपस्थितांनी होळकर यांचे प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, अर्जुन मेदनकर यांनी मनोगते व्यक्त केली.