सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली; पुढची सुनावणी ‘या’ तारखेला

0
311

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा 3 दिवस शक्यता होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाचा युक्तिवाद पुढच्या आठवड्यात होणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशीही ठाकरे गटाचे वकीलच बाजू मांडत आहेत. ठाकरे गटाकडून जवळपास अडीच दिवस अ‌ॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यांच्यानंतर अभिषेक मनु सिंघवी हे युक्तीवाद केला.

आज सुरुवातीला सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सिब्बल यांनी जवळपास अडिच दिवस जोरदार युक्तीवाद केला. त्यांनी आपल्या युक्तीवादा दरम्यान अनेक मुद्यांना हात घातला. सत्तासंघर्षादरम्यान घडलेल्या घटनांवर प्रश्न उपस्थित केले. आता ठाकरे गटाकडून सिंघवी युक्तिवाद करत आहेत. त्यांच्यानंतर अ‌ॅड. देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत.

सिब्बल यांच्या युक्तीवादात राज्यपालांचे अधिकार हा महत्त्वाचा मुद्दा होता. शिंदे यांच्या सत्तास्थापनेत राज्यपालांची भूमिका संशयास्पद. चालू असलेले सरकार राज्यपाल कोश्यारी यांनी मुद्दाम पाडले, असा युक्तीवाद त्यांनी केला. शिवसेनेचेच सरकार असताना शिवसेनेचेच आमदार सत्ता कशी काय पाडू शकतात? पक्षाचेच आमदार अविश्वास प्रस्ताव कसे आणू शकतात असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.