सुप्रियाताईंचा पराभव नक्की होणार – आशिष शेलार

0
143

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना भाजप नेते आशिष शेलार ‘बारामतीत सुनेत्रा ताई यांचा पराभव निश्चित आहे’ असे बोलून गेले. या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पत्रकारांनी शेलार यांना बारामती लोकसभेसंदर्भात प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना त्यांनी अनावधानाने असे विधान केले.

आपली चूक झाल्याचे लक्षात आल्यावर शेलार यांनी सारवासारव केली. त्यानंतर ते म्हणाले, बारामतीत सुनेत्रा ताईंचा विजय निश्चित आहे तर सुप्रियाताईंचा पराभव नक्की होणार आहे. मात्र शेलारांच्या या विधानाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आणि त्यावर विरोधकांनी जोरदार टिका केली आहे.

आशिष शेलार शुक्रवारी पुण्यात महायुतीच्या मेळाव्यासाठी आले होते. पुण्यात ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी राजेश पांडे, संदीप खर्डेकर, नाना भानगिरे, सुरेश चव्हाण उपस्थित होते.

यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका केली. घरात येणारी सून लक्ष्मी असते तिला बाहेरची म्हणणे हे वेदनादायी वक्तव्य असून लोकांना न रुचणारे आहे. पवार यांनी मराठी संस्कृती जपली पाहिजे असा सल्ला शेलार यांनी पवार यांना दिला.