सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण…! रात्रीपासून संपर्क नाही…

0
759

नाशिक,दि.०३(पीसीबी) – सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच गजरा ग्रुपचे चेअरमन हेमंत पारख यांचे इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरून चारचाकी तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची घटना शनिवारी रात्री ९:४० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत तसेच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. सीसीटीव्हीच्या आधारे अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहे. एका सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाचे अचानक अपहरण होण्याची घटना समोर येताच संपूर्ण नाशिक शहरासह इंदिरानगर भागात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, हेमंत पारख यांचा शोध घेणे, तसेच त्यांचे अपहरण कोणत्या कारणातून करण्यात आले, यामागील कारणांचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसांसमोर असणार आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिकमधील वाढती गुन्हेगारी चव्हाट्यावर आली आहे.