सुपरवायझरने केला महिला कामगाराचा विनयभंग

0
125

दिघी, दि. ०१ (पीसीबी) : माझयासोबत संबंध ठेवल्यास तुला कामात अनेक सवलती देईल, असे म्हणत सुपरवायझने महिला कर्मचा-याचा विनयभंग केला. ही घटना च-होली येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये घडली.

श्रीनिवास मधुकर गुरूधालकर (वय 40, रा. खंडोबामाळ, लोहगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 39 वर्षीय महिला कामागाराने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीनिवास याने फिर्यादी महिला कामगाराला च-होली येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या ग्राऊंड भागातील एसओई पॅसेजच्या खोलीत बोलविले. तिचा हात पकडत तुला कामात सवलत देतो, सुट्टीही देईल. फक्त माझयासोबत संबंध ठेव, असे म्हणत महिला कामगाराचा विनयभंग केला. फिर्यादी यांनी आरडा ओरडा केला असता आरोपीने त्यांच्या तोंडावर हात ठेवत पुन्हा विनयभंग केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.