सुनेत्रा पवार शंकर महाराज दर्शनाला

0
137

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी धनकवडी परिसरात सदिच्छा भेटीच्या माध्यमातून, आजच्या दौऱ्यात प्रथम शंकर महाराज समाधीचे दर्शन घेतले.

सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर ग्रामदैवत श्री जानूबाईमातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व नेते, पदाधिकारी, धनकवडीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.