सुनेत्रा पवार यांचा आज बारामती दौरा; सुनेत्रा पवार यांचं ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त स्वागत.. जे काम हाती घेते ते पूर्णच करते : सुनेत्रा पवार

0
97

बारामती दि. ३० एप्रिल
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.. सावंतवाडी येथून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.. यावेळी ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. सुनेत्रा पवार यांनी यावेळी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात याच परिसरातून केली असल्याचं सांगत ओढा खोलीकरणासारखे उपक्रम राबवल्याचा फायदा झाल्याचं नमूद केलं. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी दुवा म्हणून मी करेन असं सांगतानाच मी जे काम हाती घेते ते पूर्णत्वाला नेतेच हे बारामतीकरांना ज्ञात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या..