सुनेत्राताई पवार यांनी घेतला नानासाहेब नवलेंचा आशीर्वाद

0
227

आजच्या दौऱ्याला सुरुवात झाली ती ज्येष्ठ नेते नानासाहेब नवले आणि सौ. निर्मलाताई नवले यांची सदिच्छा भेट घेऊन घेतलेल्या आशीर्वादाने.* यावेळी नानासाहेब नवले यांनी, ‘माझी सून घरी आली आहे’, या शब्दांत माझे स्वागत केले. उपस्थित असलेल्या संत तुकाराम कारखान्याच्या सर्व संचालकांची ओळख करून दिली. त्यांच्यासह उपस्थित सर्व संचालकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. सारेजण सोबत आहेत, या शब्दात आशीर्वाद दिले.

माझे ज्येष्ठ बंधू डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याशी असणाऱ्या मैत्रीचे किस्सेही नानासाहेबांनी सांगितले. थक्क व्हावे अशी त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. माझे लग्न झालेल्या मंगल कार्यालयाचे नाव सांगून लग्नाला उपस्थित होतो, हे आवर्जून सांगितले. त्यांच्यासह सौ. निर्मलाताई, सूनबाई सौ. राणी यांनी माझ्या माहेरशी असणाऱ्या नातेसंबंधांच्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी नवले कुटुंबियांनी आग्रहाने आदरातिथ्य केले. पुष्पगुच्छ देऊन, माझी ओटी भरून शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले.

संत तुकाराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन बापूसाहेब भेगडे, संचालक अनिल लोखंडे, ज्ञानेश नवले, चेतन भुजबळ, बाळासाहेब बावकर, सुभाष राक्षे, सुभाष जाधव, मधुकर भोंडवे, सखाराम गायकवाड, नरेंद्र ठाकर, ताराबाई सोनवणे, शुभांगी गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
नानासाहेब नवले यांनी त्यांच्यासह संत तुकाराम सहकारी कारखान्याच्या संचालकांच्या वतीने शुभेच्छा व आशीर्वाद दिले. त्याबद्दल मनापासून आभार.