सुनिल शेळके आज मावळ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार.

0
54

मावळ, दि. 24 (पीसीबी) : मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार सुनिल शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा – शिवसेना – आरपीआय – स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून आज (गुरुवार, दिनांक 24 ऑक्टोबर) हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करताना वडगावमध्ये सुनिल शेळके समर्थकांकडून प्रचंड शक्ती प्रदर्शन होणार आहे. मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे समर्थक वडगावमध्ये दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. यावेळी गर्दीचा नवा उच्चांक स्थापित होईल, असा विश्वास आमदार शेळके यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार शेळके हे वडगाव मावळ चे ग्रामदैवत असलेल्या श्री पोटोबा महाराजांचे दर्शन घेऊन मिरवणूकीने तहसीलदार कार्यालयाकडे जातील. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ते उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत. वडगाव मावळ येथे उमेदवारी अर्ज भरताना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस खात्याने शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.