सुधरुढ आरोग्य व उत्तम जीवनाचे रहस्य- कलशेट्टी

0
138

दि ३० एप्रिल (पीसीबी ) – कलशेट्टीश्री राजेश्वर काशिनाथ कलशेट्टी आणि सावित्री राजेश्वर कलशेट्टी यांनी काल दिनांक २९ एप्रिल रोजी योगा हॉल कासारवाडी येथे मोफत आनंदायी जीवन शैली वर सेमिनार आयोजित केले होता.भारतीय योग संस्था, नवचैतन्य हास्य क्लब आणि जेष्ठ नागरिक संघ कासारवाडी यांच्या सदस्यांनी भरीव मदत केली.हा सेमिनार के पी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन च्या अंतर्गत आयोजित करण्यात आला, केपी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन हे नाव आई वडिलांच्या नावाच्या संदर्भात आहे.

सेमिनारमध्ये, वक्त्यांनी उत्तम जीवन आणि उत्तम आरोग्य मिळवण्याच्या पद्धती डीकोड केल्या.स्पीकर हे यूएसए मधील नेतृत्व, व्यवसाय आणि आरोग्यामध्ये प्रमाणित प्रशिक्षक आहेत. कलशेटटी यांनी सहज जिवनातील जगताना याणाऱ्या समस्या व त्यावर मात करण्याचे उपाय छोटा व मार्मिक गोष्टीच्या माघ्यमातुन नागरीकांच्य पटून दिल्या. साध्या व सोपे बदलातुन जिवनाचा सकारात्मक बदलाचा राजमार्ग त्यांनी सांगीतला. मा श्री. कलशेट्टी यांनी मानवाच्या आंतरमानात असणाऱ्या सोन्याचा वेळेत शोध घेण्याचा सल्ला देत एक गोष्ट सांगितली ते म्हणाले,” एक भिकारी एका खोक्यावर बसुन 20 वषेॅ रोज भीक मागत असे. एकदा भीक देणाऱ्या व्यक्तिने विचारले ज्या खोक्यावर आपण बसले आहात त्यात काय आहे ते कधी बघितले का? रात्री त्या भिकाऱ्याने ते खोके उघडले असता त्यात सोन्याचे बिस्कीटे होते. भिकारी म्हणाला,”मी कसला मूर्ख आहे, जो सोन्यावर बसून भीक मागत होतो.
तसेच आपले आहे, मानवाने वेळेत शरीराच्या व मानाच्या आता आसणाऱ्या सोने रुपी आरोग्याचा उपयोग करुन जीवन समरुध केले पाहिजे.

वरील कार्यक्रमाच्या वेळेस प्रमुख उपस्थिती वक्ता श्री राजेश्वर काशिनाथ कलशेट्टी आणि त्यांचा पूर्ण परिवार, मा.आशाताई शेंडगे( मा.नगरसेविका)
श्री अंकुश भामे, श्री विजय मानकर, श्री सुहास बोरावके, श्री प्रशांत तनपुरे आणि श्री देवकर सर आदी उपस्थित होते.
तसेच कासरवाडी पिंपरी चिंचवड मधील, पुणे, मुंबई येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.